कांद्यावर निर्यातबंदी लागू; केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांनामध्ये नाराजी



 
नवी दिल्ली -  देशातील कांद्याच्या दरांमध्ये झालेली वाढ थांबवण्यासाठी सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. सप्टेंबर 2019 मध्येही मोदी सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला होता. मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत आल्याने त्यावेळीही कांद्याच्या किंमती वाढल्या होत्या.
कोरोना काळात कांद्याला भाव मिळत असतानाच केंद्राने निर्यातबंदी लागू केल्याने शेतकऱ्यांनामध्ये नाराजी पसरल्याचं कळत आहे.
देशात कांद्याच्या किंमती वाढल्या आहेत. एवढंच नाही तर कोरोना काळात म्हणजेच एप्रिल ते जून या कालावधीत 19.8 कोटी डॉलर किंमतीचा कांदा निर्यात केला. तर मागच्या संपूर्ण वर्षात 44 कोटी डॉलर्सचा कांदा निर्यात झाला होता. भारतातून बांगलादेश, मलेशिया, युएई आणि श्रीलंका या देशांमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात होतो.
15 ते 20 रुपये प्रति किलोने विकला जाणारा कांदा 45 ते 50 रुपये प्रति किलो या दराने मिळतो आहे. देशभरातच हे दर वाढले आहेत. दिल्लीतल्या आझादपूर बाजारात कांद्याचा घाऊक दर 26 रुपये ते 37 रुपये प्रति किलो इतका होता. या कारणांमुळे कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. या मुळे शेतकऱ्यांनामध्ये नाराजी पसरली असून महाराष्ट्र मधील लासलगाव कांदा मार्केट बंद करण्याचा इशारा दिला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने