-सन १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात नंदूरबार शहरातील शहीद शिरीषकुमार मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांनी देशासाठी बलिदान अर्पण केले आहे.या घटनेला दि.०९ सप्टेंबर २०२० रोजी ७८ वर्ष पूर्ण होत आहेत.बालशहिद शिरीषकुमार मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्मरण व्हावे,नव्या पिढीला स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्याचे कार्य कळावे या उद्देशाने 'मातोश्री सेवा फाउंडेशन, नंदूरबार' तर्फ नंदूरबार जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी(इयत्ता ९ते१२वि शालेय गट) 'बालशहिद शिरीशकुमार मेहता आणि भारतीय स्वातंत्र्यचळवळ' व महाविद्यालयीन गटात 'भारतीय स्वातंत्र्यचळवळीत खांदेशातील क्रांतिकारकांचे योगदान' या विषयावर किमान ५०० शब्दात निबंध लिहून पीडीएफ फाईल दिनांक ७ सप्टेंबर २०२० रोजी संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत matoshreesevafoundationnandurb@gmail.com किंवा yuvakmitrango@gmail.com या email वर पाठवायची आहे.उत्कृष्ट निबंध लिहणाऱ्या प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह,सन्मानपत्र व पुस्तक देऊन गौरविले जाणार आहे असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन मातोश्री सेवा फाउंडेशन नंदूरबारचे अध्यक्ष चेतन माळी, गणेश खैरनार, नरेंद्र खवळे,विजय माळी यांनी केले आहे.
Tags
news
