राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेच्या धुळे युवा जिल्हाध्यक्ष पदी जितेंद्र पाटील यांची निवड





 धुळे:- राष्ट्रीय धर्म परिषदेची जिल्हा बैठक धुळे तालुक्यातील कापडणे येथील महामहेंश्वर शिवमंदिरात भक्तीमय वातावरणात पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय धर्म परिषदेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक ह.भ.प. प्रशांत महाराज पाटील (अजनाड ता. शिरपूर) यांची तसेच गुजरातचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष ह.भ.प.आनंद महाराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत वारकरी संप्रदायाचे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प प्रशांत महाराज यांच्या हस्ते वाडीभोकर येथील सामाजिक कार्यात कायम अग्रेसर राहणारे जितेंद्र नारायण पाटील यांची राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेच्या युवा धुळे जिल्हाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करून तसे नियुक्तीपत्र देण्यात आले. ह्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक अध्यक्ष ह.भ.प प्रशांत महाराज पाटील अजनाडकर व गुजरात प्रदेश अध्यक्ष आनंद महाराज पाटील यांनी विविध धार्मिक प्रश्नांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला धुळे जिल्हा अध्यक्ष दिनेश महाराज कंचनपूरकर पाटील, कोषाध्यक्ष ह.भ.प हेमंत चौधरी महाराज कापडणेकर, वाडीभोकर ह.भ.प समाधान महाराज, ह.भ.प मयूर महाराज, ह.भ.प सुरज महाराज, ह.भ.प बुधा महाराज, ह.भ.प जितेंद्र धनगर महाराज, ह.भ.प अनिल चित्ते. तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ह.भ.प नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जितेंद्र पाटील यांच्या निवडी बद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने