शहादा (प्रतिनिधी) : जावदे त.ह (ता.शहादा) येथील शेतकऱ्यांना विविध अँप संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले , के.व्ही.पटेल कृषि महाविद्यालय , शहादा येथील विद्यार्थी हर्षल निकुंभ याने त्याच्या रुरल अँग्रीकल्चर वर्क एक्सपेरियन्स ( रावे या उपक्रमाअंतर्गत ) येथील शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांना कृषी क्षेत्रातील उपलब्ध असलेले विविध अँप संदर्भात माहिती दिली . प्रत्यक्ष प्रात्यक्षिक म्हणून शेतकऱ्यांना ते अँप आपल्या मोबाइल फोन मध्ये कसे वापरावे याबाबत संपूर्ण माहिती देऊन शेतकऱ्यांच्या विविध समस्या व प्रश्नांचे निरसन केले. यामुळे शेतकरी बांधव समाधानी झालेत . हर्षल निकुंभ यांचे याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश पाटील , प्रा.चंद्रशेखर पाटील व प्रोग्राम अधिकारी प्रा.संदीप पाटील यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्यात .
Tags
news
