कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी
राज्य शासनाच्या मार्गदर्शक
सूचनांचे नागरिकांनी पालन करावे
धुळे, दि. 8 (जिमाका वृत्तसेवा) : धुळे जिल्ह्यातील
कोरोना विषाणूबाधित (COVID19) रुग्ण बरे होण्याचा दर 78 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून मृत्यू दर 2.92 टक्के एवढा आहे. धुळे जिल्ह्यातील एकूण 10 हजार 34 कोरोनाबाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 8 हजार 31
रुग्ण कोरोना विषाणूमुक्त होवून आपापल्या घरी परतले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे
जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी
अनावश्यक गर्दी टाळावी, मास्कचा नियमितपणे वापर करावा आणि सोशल
डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी
संजय यादव यांनी केले आहे.
धुळे जिल्ह्यात 10 एप्रिल 2020 रोजी कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. या
विषाणूचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. धुळे जिल्ह्यात
कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या 10 हजार 34 एवढी झाली आहे. त्यापैकी 293 रुग्णांचा
मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 60 वर्षांवरील
अधिक नागरिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांना कोरोना विषाणूची
बाधा होण्यापूर्वी मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार,
किडनीचे विकार असल्याचे निदर्शनास आले आहे. बहुतांश
रुग्णांना शेवटच्या टप्प्यात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे उपचार सुरू असताना यापैकी काही रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
आतापर्यंत 8 हजार
31 कोरोना विषाणूबाधित रुग्ण बरे होवून आपापल्या घरी परतले आहेत.
उर्वरित रुग्णांवर डेडिकेटेकड कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर झालेले श्री
भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर तथा जिल्हा सामान्य रुग्णालय, धुळे, अण्णासाहेब चुडामण पाटील वैद्यकीय महाविद्यालय
व रुग्णालय, धुळे, उपजिल्हा रुग्णालय,
दोंडाईचा, ता. शिंदखेडा,
उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, महानगरपालिका व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जिल्हा रुग्णालयातील डेडिकेटेड
कोविड हेल्थ सेंटर, कोविड केअर सेंटर, दोंडाईचा,
बाफना आणि एसएसव्हीपीएस कोविड केअर सेंटर, शासकीय तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक), धुळे, कोविड केअर
सेंटर, शिंगावे, ता. शिरपूर, कोविड केअर सेंटर, शिंदखेडा
येथे औषधोपचार सुरू आहेत.
शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात 232,
जिल्हा सामान्य रुग्णालय, धुळे येथे 48,
अण्णासाहेब चुडामण पाटील वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय
येथे 73, उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर येथे
58, उपजिल्हा रुग्णालय, दोंडाईचा येथे 40,
शासकीय तंत्रनिकेतन येथे 106, अजमेरा आयुर्वेद
महाविद्यालयातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे 36, महानगरपालिका
आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे 9,
कोविड केअर सेंटर, शिंगावे येथे 69, तर शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये
62, साक्री कोविड केअर सेंटर येथे 68 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरू
आहेत.
धुळे महानगरपालिका क्षेत्रात 7 सप्टेंबर 2020
अखेर 4 हजार 734 रुग्ण आढळून
आले आहेत. त्यापैकी 135 रुग्णांचा मृत्यू
झाला आहे, तर तीन हजार 810 रुग्णांना औषधोपचारांती
घरी सोडण्यात आले आहे. सध्या 789 रुग्णांवर
उपचार सुरू आहेत. धुळे जिल्हा ग्रामीण भागात पाच हजार
300 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 158
जणांचा मृत्यू झाला आहे, तर चार हजार
221 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 921
रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अन्य तालुक्यातील
रुग्णांची माहिती अशी (अनुक्रमे उपचार घेत असलेले रुग्ण, मृत्यूमुखी पडलेले रुग्ण, रुग्णालयातून घरी सोडलेले रुग्ण
आणि एकूण रुग्ण संख्या या क्रमाने) : धुळे तालुका, 305,
55, 846, 1206. शिरपूर तालुका- 257, 48, 1650, 1955. शिंदखेडा तालुका- 232, 31, 1117, 1380. साक्री तालुका-
127, 24, 608, 759. धुळे जिल्ह्याबाहेरील एकूण 219 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 24 रुग्ण उपचार घेत आहेत. 170 रुग्णांना घरी सोडण्यात आले
आहे, तर 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारासाठी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व सर्वोपचार रुग्णालयात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली
100 बेडचा अद्ययावत आयसीयू कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
60 व्हेन्टिलेटर्स उपलब्ध आहेत. आतापर्यंत डायलिसिसच्या
50 रुग्णांवर उपचार करण्यात आले असून ते बरे झाले आहेत. लवकरच ऑक्सिजन टँकची योजना कार्यान्वित होईल. सध्या
206 बेडपर्यंत ऑक्सिजनच्या पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय जिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालयातील महानगरपालिकेचा कक्ष,
अजमेरा आयुर्वेद रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय,
शिरपूर, दोंडाईचा येथे ऑक्सिजन युक्त बेडची सुविधा
करण्यात आली आहे.
या रुग्णांवर
धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी श्री.
यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी
वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजिज शेख, पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ.
विशाल पाटील, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ,
जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवचंद्र
सांगळे, जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. मनीष
पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरू आहेत.
|
नागरिकांनी जबाबदारीने
वागावे! धुळे जिल्ह्यात
गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ही
चिंतेची बाब असली, तरी या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन सर्वंकष प्रयत्न करीत आहे. त्यामुळे आतापर्यंत 8 हजारांवर रुग्ण बरे होवून आपापल्या
घरी परतले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा
प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची तेवढीच
आवश्यकता आहे. माझे नागरिकांना नम्र निवेदन आहे, की त्यांनी काम असेल, तरच घराबाहेर पडावे. घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावाच. तसेच सोशल डिस्टन्स
ठेवावे. तसे करणे आपल्या कुटुंबासाठी व समाजाच्या सुरक्षिततेसाठी
ते आवश्यक आहे. ‘कोरोना’ काळात नागरिकांनी
राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत जबाबदारीने वागावे. जेणेकरून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावास आळा बसू शकेल. - संजय यादव, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, धुळे |
