डॉ विजयराव व्ही रंधे इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शिरपूर येथे क्रीडा दिवसानिमित्त साहित्य,व मैदान पूजन संपन्न

 



शिरपूर - किसान विद्या प्रसारक संस्था संचालित डॉ विजयराव व्ही रंधे इंग्लिश मेडिअम स्कूल शिरपूर येथे २९ऑगस्ट आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका कामिनी पाटील यांनी स्वीकारलं तर हॉकी क्रीडा पटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व क्रीडा साहित्याचे पूजन शाळेचे शाळेचे ऍडमिनिस्ट्रेटीव्ह ऑफिसर श्री प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.हॉकीचे जादूगार अशी प्रसिद्धी मिळविलेले मेजर ध्यानचंद यांनी भारताला सुवर्णयुगाची अनुभूती दिली म्हणून २९ऑगस्ट हा जन्मदिन  राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतात व दैनंदिन जीवनात व्यायामाच महत्व प्रमोद पाटील यांनी विशद केलं. त्यानिमित्त शाळेत शिक्षकांनी सामाजिक अंतर ठेवून कॅरम व  बुद्धिबळ  खेळ खेळून क्रीडा दिवस साजरा केला.या कार्यक्रमाच आयोजन क्रीडा शिक्षिका शितल चव्हाण, स्वाती चव्हाण यांनी केल.या प्रसंगी शाळेच्या जेष्ट शिक्षिका रमाकांती विश्वकर्मा ,समाधान राजपूत, ज्योती देशमुख, वंदना पांडे, छाया पाटील ,शगुफ्ता पिंजारी, मनीषा पटेल, पवित्त्रा राजपूत, उमेश राजपूत,पदमा सूर्यवंशी उपस्तीत होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा लोखंडे यांनी केले. तर आभार उमेश राजपूत यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने