*चोपडा* ..गेल्या २२ मार्च २०२० पासून महाराष्ट्रात तील परिवहन महामंडळ च्या १८४५० बसेस बंद असून अनलॉक ४ काळापासून सरकार त्या सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे .बस सेवा पूर्ववत सुरु झाली पाहिजे. ही गोष्ट खरी आहे पण कोरोना महामारी काळ सुरू असल्याने हल्ली ज्या सेवा चालू आहेत त्या ना पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही म्हणणेपेक्षा प्रवाशांना गाड्यांचे जाणे येणे चे वेळापत्रक चूक माहीत नाही म्हणून घोळ होतोय तथापि महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना १९६० साली झाली त्यावेळी काही मोजक्याच गाड्या प्रत्येक जिल्ह्यात धावत होत्या परंतु त्यांचे वेळापत्रक अचूक होते म्हणून कोरोना महामारी काळात जनतेला परिवहन सेवेवर विश्वास बसण्यासाठी जाण्याच्या गाड्या व येण्याच्या वेळा गाड्यां चे वेळापत्रक वर्तमानपत्रातून जाहीर व्हावे म्हणजे लोकांपर्यंत ती माहिती जाऊन लोकांना काही कामासाठी दुसऱ्या गावात जावयाचे असल्यास तेथून काम झाल्यावर परत येण्याची हमी मिळेल व परिवहन मंडळात मंडळाच्या गाड्यांमधून पूर्ववत प्रवास करतील अर्थात या गाड्या दिवसातून एकदा सॅनीटाईझर फवारणी करून निघाल्या पाहिजेत अशी मागणी लाल बावटा शेतमजूर युनियन तर्फे काम्रेड अमृत महाजन वनामाळी गोरख वानखेडे ,वासुदेव कोळी ,अरमान तडवी, प्रेमसिंग बारेला, लक्ष्मण शिंदे, हिराबाई सोनवणे, आनंदा भिल प्रताप बारेला आदिंनी केली आहे
मोजक्या गाड्यांचे येजा वेळापत्रक जाहीर करून एसटी सेवा सुरु करा लालबावटा ची मागणी
byMahendra Rajput
-
0
