शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या आज 15 ऑगस्ट च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे झालेल्या कार्यक्रमात धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व निष्ठेने कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांच्या सत्कार करून प्रशासनाने त्यांच्या कार्याचा सन्मान करून त्यांचे मनोबल वाढवण्याच्या प्रयत्न केला आहे.
देशात मागील मार्च महिन्यापासूनच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून महाराष्ट्र राज्यात देखील covid-19 या संसर्गजन्य आजारामुळे परिस्थिती गंभीर झाले आहे. या सर्व परिस्थितीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करणे, वारंवार घोषित होणाऱ्या जनता कर्फ्यू, लॉक डाऊन, संचार बंदी, जमावबंदी इत्यादी नियमांचे पालन करण्याची जबाबदारी पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्यावर येऊन ठेपली आहे. शिवाय या काळात जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन ,ग्रामपंचायत ,नगरपालिका, आरोग्य विभाग यांच्याशी समन्वय साधून बंदोबस्त व उपायोजना करण्याचे देखील मोठे आव्हान होते. या सर्व विपरित परिस्थितीमध्ये थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांनी आपल्या कार्यक्षमतेने अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने सुयोग्य असे नियोजन करून परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम केले. कोणाकडूनही साथरोग प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत व नागरिकांना या गंभीर परिस्थितीची जाणीव करून देत त्यांनी गावागावात चोख पणे बंदोबस्त पाळून आपले कर्तव्य निभावले. याकाळात नियमभंग करणाऱ्या अनेकांवर पोलिसी कारवाई केली, अवैधपणे जमाव करून सट्टा जुगार खेळांवर कारवाई करून दहशत निर्माण केली, परिसरात चालणारे अवैध व्यवसाय, अवैध देशी विदेशी दारू विक्री केंद्र त्यांच्यावर धडक कारवाई करून गुन्हे दाखल केले, कर्तव्य बजावत असताना त्यांनी स्वतः ला या आजाराशी दोन हात करत त्यावर मात मिळवली आणि पुन्हा नव्याने कामास सुरुवात केली. एक जबाबदार नागरिक कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी या नात्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या या कोव्हिडं योद्धा च्या कामाची प्रशासनाने दखल घेऊन त्यांच्या आज सत्कार करण्यात आला आहे.
त्यांच्या आज रोजी झालेल्या सन्माना निमित्त गाव परिसरातून व पोलीस विभागातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या तरुण तडफदार अधिकाऱ्याचा सन्मान झाला म्हणून निर्भीड विचार न्यूज परिवाराकडून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
Tags
news


