नाशिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची प्रवेशाकरिता ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ




                         नाशिक  जिल्हा प्रतिनिधी  शांताराम दुनबळे यांजकडून .
नाशिक - :करोना संकटाच्या काळात अनेक कुटुंबां समोर रोजगाराच्या समस्या आणि आर्थिक संकट उभे राहत असताना कुटुंबातील महिला रोजगार शोधण्यासाठी धडपडत आहेत जागतिक मंदी आणि त्यात करोना चे संकट या परिस्थितीत महिलांच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून मिळालेल्या प्रशिक्षणामुळे अनेक महिला कुटुंबाचा आधार बनल्या आहेत सन २०२०. २०२१ शैक्षणिक वर्षाकरिता औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची या शासकीय संस्थेची प्रवेशप्रक्रिया सुरू आहे रोजगाराची आवश्यकता असणाऱ्या महिला विशेषता तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपले भवितव्य घडवावे असे आवाहन संस्थे तर्फे करण्यात आले आहे करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रवेश घेण्याची मुदत राज्य शासनाने ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविली असून महिलांच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत डिजिटल फोटोग्राफी हा राज्यातील आयटीआय स्तरावरील  महत्वाचा कोर्स तसेच कॉम्प्युटर ऑपरेटर आणि पेंटर जनरल यासह रोजगार देणारे  विविध एक आणि दोन वर्षाचे मुदतीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत या सर्व व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी दहावी पास ही शैक्षणिक पात्रता आवश्यक  असून वयाची फारशी अट नाही मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकांना फी मध्ये मोठी सवलत उपलब्ध आहे संस्थेचे अद्यावत  होस्टेल उपलब्ध आहे  संस्थेतील अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर शासकीय प्रमाणपत्र मिळते या प्रमाणपत्राचा उपयोग नोकरी अथवा अथवा व्यवसायासाठी होतो शासकीय प्रमाणपत्र  शासकीय योजनेतून व्यवसायासाठी कर्ज प्राप्त  होण्यासाठी  उपयुक्त ठरते संस्थेमार्फत देखील प्रशिक्षणार्थींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात संस्थेत प्रशिक्षण घेतलेल्या अनेक महिला आज सरकारी आणि खाजगी नोकरीत काम करीत आहेत तर काही जणी स्वतःचे व्यवसाय करून उत्तम आर्थिक प्राप्ती करीत आहेत रोजगारासाठी इच्छुक महिलांनी त्वरित www.admission.dvet.gov.in या संकेत स्थळाला ३१ ऑगस्टपर्यंत संपर्क करावा अधिक माहिती करता 02532313514 या नंबरला संपर्क करावा असे आवाहन      सौ माधुरी भामरे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींची नाशिक या संस्थेतर्फे करण्यात आले आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने