शहादा (प्रतिनिधी) :- काल धुळे येथे अभाविप कार्यकर्ते व विद्यार्थी यांच्यावर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मूक संमतीने पोलिस प्रशासनाने अमानुष लाठीचार्ज व बुक्याच्या मारा केला. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा शहादा तर्फे आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. विद्यार्थ्यांना मारहाण करताना कार मधून बघ्याचीभूमिका घेणारे पालक मंत्री अब्दुल सत्तार हे सर सकट विद्यार्थ्यांना पास करण्याचे वचन देणारे परंतु नापास करणारे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अ.भा.वि.प. करते. विद्यार्थ्यांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात , अन्यथा अभाविप तीव्र आंदोलन करेल . यावेळी तालुका प्रमुख पृथ्वीराज रावल , जिल्हा महाविद्यालय प्रमुख योगेश आहिरे जिल्हा समिती सदस्य स्वप्नील जैन, जिल्हा TSVK प्रमुख जयेश पाटील ,चरण जाधव चैतन्य खैरनार व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
news
