शिरपूर प्रतिनिधी - राज्यात कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे 31 ऑगस्टपर्यंत लॉक डाऊन लागू असून यादरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. मात्र थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काही लोक शासन नियमांचे उल्लंघन करून व जमावबंदीचे आदेश झुगारून नियमांचे उल्लंघन करत असल्याबाबत 52 पत्त्यांच्या जुगार व जन्ना मन्ना चा खेळ खेळत असल्याबाबत गोपनीय माहिती थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंके यांना प्राप्त झाले होती त्यानुषंगाने धडक कारवाई करण्यासाठी पथक तयार करून केले असता दिनांक 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वा तालुक्यातील होळनांथे तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे नांथे शिवारात असलेल्या फॉरेस्ट च्या वनीकरण भागात काटेरी झुडपात जमिनीवर बसून जुगार खेळत असताना राकेश शिरसाट (पळून गेलेला) मोहन भिल (पळून गेलेला पूर्ण नाव माहीत नाही) गुलाब शिवाजी भिल वय 38 राहणार अजंतीसिम तालुका चोपडा जिल्हा जळगाव, मनोहर भरत पाटील वय 32 राहणार घोडसगाव तालुका शिरपूर राजू छनू कोळी वय 45 राहणार वडोदा तालुका चोपडा , सुनील चैत्राम पाटील वय 35 अजंतीसिम तालुका चोपडा जिल्हा जळगाव, अशोक रावा पाटील वय 45 रा. मोहिदे ता चोपडा, गणी भिका भगवान वय 30 राहणार अजंदे बुद्रुक होळनांथे तालुका शिरपूर, रमेश मुरलीधर पाटील वय 42 राहणार वडोदा तालुका चोपडा हे जुगार व झन्नामन्ना खेळत असताना आढळून आले यांच्याकडून मोटर सायकल मोबाईल सह रोख रक्कम रुपये 97 , 140 मिळून आले पंचांसमक्ष पंचनामा करून यांच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल विजय मच्छिंद्र जाधव यांच्या फिर्यदि नुसार पोलीस स्टेशनला गुन्हा र जी नंबर 27/ 2020 भादवि कलम 269/ 270 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 इत्यादी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
तसेच मांजरोद तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे दि 9 ऑगस्ट रोजी साय 7.55 वा छापा टाकला असता आनंदा कोळी (पळून गेलेला) मुकुंदा भिवसन शिरसाट वय 54, विजय दगडू अखडमल वय 23 ,दिलीप धोंडू कोळी वय 36 ,कपिल नरेंद्र राजपूत वय 26, दिलीप राजेसिंग राजपूत ,भागवत भिला भिल राहणार सर्व मांजरोद तालुका शिरपूर जिल्हा धुळे हे मांजरोद गावातील नवीन प्लॉट जवळील काटेरी झुडपात जमिनीवर जुगार व जन्ना मन्ना खेळत असताना आढळून आले त्यांच्याकडून मोटरसायकलसह रोख रक्कम रुपये 31, 600 रुपये जप्त करून पंचांसमक्ष पंचनामा करून पोलीस कॉन्स्टेबल सिराज खाटीक यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा र जी नंबर 27/ 2020 भादवि कलम 269/ 270 राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 इत्यादी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
सदरची कार्यवाही साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सिराज खाटीक, विजय जाधव, डी डी कोळी,एम ए शेख यांनी केली आहे
Tags
news

