शहादा प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सावळदे या गावातील रेशन दुकान चालकांविरुद्ध गावातीलच लाभार्थी सुमित युवराज गिरासे यांनी तहसीलदार शहादा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत त्यांनी असे नमूद केले आहे की त्यांच्याकडे प्राधान्य कुटुंबातील रेशनकार्ड आहे आणि ते गावाचे रहिवासी आहेत रेशन दुकान धारक यांच्याकडे रेशनची मागणी केली असता ते कोणत्याही प्रकारच्या रेशन मालल देत नाहीत. यापूर्वी माहे एप्रिल आणि मे महिन्याचे रेशन आम्हास प्राप्त झाले आहे जून 2020 पासून आम्हास रेशन देणे बंद केले आहे शासन नियमानुसार मिळणारे रेशन हे प्रत्येकला मिळायला पाहिजे मात्र दर महा रेशन मिळत नाही .मालाची पावती मिळत नाही .याबाबत दुकानदार यांना विचारणा केली असता ते बेजबाबदारपणे उत्तरे देत असून लाभार्थ्यास दमदाटी करतात याबाबत पुरवठा विभागाकडे तक्रार केली असता विभागातील अधिकारी पंकज खैरणार यांनी दुकान दारा प्रमाणेच बेजबाबदारपणे उत्तरे देऊन उलट टपाली तक्रारदार यास धमकावण्याचा प्रयत्न केला गेला आहे . त्यामुळे मी सदर प्रकाराची तक्रार प्रांत अधिकारी शहादा, अन्न व पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य, जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार आणि जिल्हाधिकारी सो नंदुरबार, याना केली असून याबाबत चौकशी होऊन सदर दुकानदार यांचे वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
Tags
news
