धान्य साठवण्याच्या कोठी मध्ये सापडला सुका गांजा, शिरपूर तालुका पोलीस स्टेशन ची कारवाई

 



 शिरपूर प्रतिनिधी -  एके काळी स्पिरीटचा तालुका म्हणून ओळख झालेला शिरपूर तालुका हळू हळू गांजा हब  च्या मार्गावर असल्याची चिन्हे दिसत आहेत. मागील सहा महिन्याच्या काळात शिरपूर शहर आणि तालुका पोलीस स्टेशन गांजा प्रकरणात अनेक प्रकारच्या कारवाई केल्या आहेत. मात्र फक्त पोलीस कार्यवाही करून काही सिद्ध होणार नसून या संपूर्ण प्रकाराच्या बिमोड करावयाच्या असेल तर सर्वच  यंत्रणांची जबाबदारी आहे. तालुक्यात गांजाचे बियाणे येते गांजाची लागवड होते, त्या मालाची वाढ होते आणि तो विक्रीस देखील नेला जातो तोपर्यंत या तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांना, तलाठ्यांना मंडळ अधिकाऱ्यांना याबाबत कोणताही सुगावा राहत नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आणि म्हणूनच तालुक्याच्या आदिवासी भागात अनेकांचा गांजा लागवडीकडे दिसून येत आहे.
 शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक 28 ऑगस्ट रोजी गोपनीय बातमी द्वारे  माहिती प्राप्त झाली होती की एका इसमाने त्याच्या घरात   अमली सदृश्य पदार्थ गांजा ,चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने लपवला आहे. सदर माहितीच्या आधारे एक पथक तयार करून लाकडे हनुमान  या गावी जाऊन चंदनसिंह रामश्या पावरा त्याच्या घरावर छापा टाकला असता सदर ठिकाणी छापा दरम्यान धान्य  साठवण्याच्या कोठी  मध्ये सुकवलेला गांजा व गांजाची लागवड करण्याकरता आवश्यक असलेल्या बियांच्या साठा मिळून आला.  सदर कारवाई मध्ये 7 लाख 15 हजार रुपये किमतीचा 143 किलो सुका गांजा, किंमत प्रति किलो पाच हजार रुपये, 1 लाख रुपये किमतीचे 10 किलो गांजा लागवडीकरता चे बियाणे अंदाजित किंमत प्रति किलो 10 हजार रुपये असा एकूण हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
 सदर प्रकरणात आरोपी चंदनसिंग रामश्या पावरा राहणार लाकडे हनुमान तालुका शिरपूर याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीस आल्याची चाहूल लागताच तो फरार झाला आहे .आरोपीचा शोध घेणे सुरू आहे मात्र आरोपीच्या विरोधात एन डी पी एस कायदा कलम 20 आणि 22 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र खैरनार करत आहेत
 सदरची कारवाई शिरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या सांगवी पोलीस स्टेशनचे सपोनि अभिषेक पाटील, पोसइ दीपक वारे ,नरेंद्र खैरनार, पोना पवन गवळी, संजीव जाधव, प्रवीण धनगर ,संदीप शिंदे ,सिद्धांत मोरे ,महिला  पो ज्योती गावडे ,यांच्या पथकाने  केली असून  धुळे जिल्हा पोलिस अधिक्षक चिन्मय पंडित ,अप्पर पोलीस अधीक्षक राजू भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने