करणी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश युवाशक्ती अध्यक्ष गिरीश दादा परदेशी यांचा धुळे जिल्ह्यात कार्यकर्ता भेट




शिंदखेडा - करणी सेनेच्या महाराष्ट्र प्रदेश युवाशक्ती अध्यक्ष मा.गिरीश दादा परदेशी यांचा धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यातील बळसाने येथे कार्यकरते व समाज बांधवांच्या सदिच्छा भेटी साठी रविवारी दि.०९ तारखेला बळसाणे ता. साक्री जि.धुळे येथे कार्यक्रमा साठी येत आहेत.
 दादांच्या हस्ते करणी सेनेच्या नवीन पदाधिकारीनां नियुक्ती पत्र देऊन सत्कार समारंभ करून ते मार्गदर्शन करणार आहेत . तरी परिसरातील सर्व समाज बांधवांनी कार्यक्रमात उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे. सदरचा कार्यक्रम दि.०९/०८/२०२० वार:- रविवार, वेळ:-दुपारी ०१ वाजता ठिकाण:- विठ्ठल मंदिर चौक बळसाणे ता.साक्री जि.धुळे येथे होणार असून 
गिरीश दादा परदेशी व आलेले सर्व मान्यवरांच्या धुळे जिल्ह्यात हार्दिक स्वागत करणी सेना धुळे जिल्हा करत आहेत. समाज बांधवांना विनम्र आवाहन करण्यात येते की कार्यक्रमाला येतानां रूमाल किवा माक्स घेऊन यावे व सोशल डिस्टिंग चे नियम पाळावे व शासन नियमाचे कोणत्याही प्रकारे भंग होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन करणी सेनेच्या आयोजकांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने