धुळे, दि. 28 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे यांच्यातर्फे
15 व 16 सप्टेंबर 2020 दरम्यान ऑनलाइन पध्दतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात व्हीडिओ कॉन्फरन्स, मोबाईलद्वारे मुलाखती होतील, असे सहाय्यक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी कळविले आहे.
जिल्ह्यातील ज्या स्थानिक उद्योजकांना रिक्तपदे भरावयाची आहेत त्यांनी या ऑनलाइन मेळाव्यात आपली रिक्तपदे अधिसूचित करावीत. जेणेकरून त्यांना योग्य, गरजू
उमेदवार उपलब्ध होवू शकतील. भरतीसाठी इच्छुक उद्योजकांनी जास्तीत जास्त रिक्त पदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनवर Click करून Dhule Online
Job Fair 2 या मध्ये अधिसूचित करावी. याबाबत काही अडचण असल्यास या कार्यालयाचा
दूरध्वनी क्रमांक 02562- 237389 यावर संपर्क
साधावा. या मेळाव्याचा भरती इच्छुक उद्योजक व बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाइन पध्दतीने लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त डॉ. कोल्हे यांनी केले आहे.
