शिरपूर - दि शिरपुर एज्युकेशन सोसायटी संचलित तालुक्यातील होळनांथे येथील आर.सी. पटेल इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल तर्फे सर्वच विद्यार्थ्यांना प्राचार्य जपश्री मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन लागू झाल्यानंतर त्वरीत दि. 27 मार्च पासून सीबीएसई पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्कू्ल च्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अध्ययन व अध्यापन कार्य सुरु आहे. तसेच वर्कशीट देेेखील विद्यार्थ्यांना दिले जावून त्यांच्याकडून ऑनलाईन पूर्ण करुन घेतली जात आहेत. हे वर्कशीट शिक्षकांकडून ऑनलाईन तपासले जातात.पालक खूप आनंदित आहेत. विद्यार्थ्यांना कला, हस्तकौशल्य, शारीरिक शिक्षण, योगा, बुद्धीबळ इ. चे ऑनलाईन पाठ घेण्यात येत आहेत.ग्रामीण भागात पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक वर्गांना ऑनलाईन शिकविण्यामुळे विद्यार्थीसुद्धा खुश असून नियमितपणे सातत्याने ते अभ्यासात मग्न असल्याचे दिसून येत आहेत. शाळा ऑनलाईन पद्धतीने पूर्ण तास चालू आहे आणि पालक देेेखील त्याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत. पालकही आपल्या लहान चिमुकल्या पाल्यांसोबत त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सहभागी होत आहेत.या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सीईओ डॉ. उमेश शर्मा तसेच प्राचार्य जपश्री मुखर्जी यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचे कौतुक केले आहे.
