शिरपुरात ई-पास सुविधा केंद्राचा असंख्य नागरिकांना लाभ



शिरपूर - शिरपूर तालुक्यातून बाहेरगावी जाणाऱ्या व्यक्तींसाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या प्रयत्नाने शिरपूर येथे आर. सी. पटेल मेन बिल्डिंग येथे मोफत ई-पास सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून असंख्य नागरिक या मोफत ई-पास सुविधेचा लाभ घेताना दिसून येत आहेत. तसेच नागरिक या सेवे बद्दल समाधान व्यक्त करीत आहेत.
आर. सी. पटेल मेन बिल्डिंग येथे शिरपूर शहर व तालुक्यातील नागरिकांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडचणीच्या काळात मोफत ई-पास ची व्यवस्था करण्यात आल्याने सर्व नागरिक मनापासून समाधान व्यक्त करीत आहेत.
गुरुवारी दि. 14 मे रोजी या मोफत ई-पास सुविधा केंद्रावर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच ई-पास काढण्यासाठी आलेल्या नागरिकांशी सुसंवाद देखील साधून त्यांची विचारपूस केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्याने शिरपूर तालुक्यात अडकून पडलेल्या नागरिकांना सोय करण्यात आली आहे. प्रशासनाने ई-पास अत्यावशक केले आहे. परंतु या महामारीच्या काळात जनतेची होणारी गैरसोय व आर्थिक पिळवणूक 
लक्षात घेता तालुक्यातील जनतेसाठी शहरातील आर.सी.पटेल मेन बिल्डींग (पोस्ट ऑफिस समोर) येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नागरिकांना मोफत ई – पास काढण्यासाठी सुविधा केंद्र दि. १३/५/२०२० पासून सुरु करण्यात आले आहे.
जनतेने या मोफत सुविधेचा सोशल डिस्टन्सिंग ठेवून लाभ घ्यावा. गरजू नागरिकांनी ई-पास काढण्यासाठी येताना सोबत, ज्या व्यक्तींना बाहेरगावी जायचे आहे त्या सर्वांचे मेडिकल सर्टिफिकेट, ओरिजनल आधार कार्ड, पासपोर्ट फोटो सोबत आणावे असे कळविण्यात आले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने