भारतीय जैन संघटना चा उपक्रम : लाँकडाऊन व संचारबंदीत ही बळसाणे गावात धावली भारतीय जैन संघटना




बळसाणे  : लाँकडाऊन व संचारबंदी च्या काळात ज्या व्यक्तींना किरकोळ आजार असतील परंतु ते डॉक्टरांकडे जाऊ शकत नाहीत अशा रुग्णांसाठी भारतीय जैन संघटना व फोर्स मोटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी दि. ७ रोजी बळसाणे गावात डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम भारतीय जैन संघटने तर्फे राबविण्यात आला
  डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम बळसाणे गावातील विश्वकल्याणक परिसरात व मुख्य बाजारपेठेतील विठ्ठल मंदिर परिसरात ईत्यादी ठिकाणी उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारी सदस्य विजय दुग्गड , धुळे शहराध्यक्ष सचिन कोठारी , दिपक छाजेड , लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग राजपूत , कांतीलाल जैन , गिरीश कोचर यांच्या सह आदी यावेळी उपस्थित होते
 याप्रसंगी बळसाणे येथील भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष व ग्रा.प.सदस्य महावीर जैन  यांनी मनोगतातून सांगितले की सध्या देशभर असलेल्या लाँकडाऊन च्या परिस्थिती मुळे सर्वत्र बंद आहे याबंदीमुळे शहरातील बहुतेक रुग्णालय बंद आहेत पण बळसाणे गावात क्लिनिक सेवा बजावत असल्याचे व्रुत्त आले आहे तरीसुद्धा भारतीय जैन संघटनेने ग्रामीण भागात जावून किरकोळ आजारांवर सध्या घरगुती उपचार किंवा अंगपाठ कणकण होणे याकिरकोळ आजारांकरिता डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम सुरू आहे आपल्या गावी व आपल्या दारी तज्ज्ञ डॉक्टराची सेवा उपलब्ध झाली आहे रुग्णांची तपासणी करून मोफत औषध देण्यात आली याकामी तज्ज्ञ डॉक्टरात बळसाणे येथील मातोश्री क्लिनिक चे डॉ. यशवंत पाटील ,  डॉ. हरिदास अहिरे  , डॉ. संजय पाटील , डॉ. प्रशांत बागुल  , डॉ. भाऊसाहेब देवरे ईत्यादींनी तपासणी करून किरकोळ आजारावर पुढील उपचार व्हावा या उद्देशाने औषधी संघटनेकडून विनाशुल्क दिल्याचे बळसाणे ग्रा.प.सदस्य महावीर जैन यांनी सांगितले
 या उपक्रमात ताप , खोकला , सर्दी , अंगदुखी , डोळ्याची दाह , सुज , नाक गळणे इत्यादी आजारांची तपासणी करून मोफत औषधी देण्यात आली आसपास गर्दी होणार नाही याबाबत दक्षता आयोजकांनी घेतली विठ्ठल मंदिर चौकात ५ - ५ फुटाच्या अंतरावर खुर्च्या ठेवल्या होत्या या खुर्च्यांवर बसलेल्या रुग्णांची तपासणी क्रमाक्रमाने करण्यात आला तपासणी साठी आलेल्या रुग्णांनी मास्क व रुमाल तोंडाला बांधलेले होते प्रत्येक व्यक्ती ने सुरक्षित डिस्टन्स ठेवून शासनांच्या नियमाचे पालन करून सेवेचा लाभ घेतला देशात कोरोना या महामारी चे भयावह संकट असतांना ही आपल्या गावात व आपल्या दारावर डॉक्टरांनी तपासणी करून योग्य उपचार केले व ओषधी दिल्या व देशभरात भारतीय जैन संघटना डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम राबवत असल्याचे कौतुक महावीर जैन यांनी केले डॉक्टर आपल्या दारी हा उपक्रम यशस्वीसाठी  बळसाणे भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष महावीर जैन , राकेश कोचर , परेश जैन , प्रशांत जैन , ललित जैन , युवराज खांडेकर , योगेश महाजन , वशिम पठाण , भुषण दाभाडे यांनी परिश्रम घेतले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने