शिरपूर प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील आमोदे या गावात 15 दिवसांपूर्वी कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली होती आणि त्यामुळे शिरपूर शहरासह परिसर हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषित झाला होता यानंतर नागरिकांच्या सहकार्याने व प्रशासनाच्या कुशल नेतृत्वाने संयम आणि शिस्त दाखवत कार्य केल्यामुळे मागील पंधरा दिवसात शहर आणि परिसरात परिस्थिती नियंत्रणात राहिली आणि कोणत्याही नवीन रुग्णांची नोंद झाली नाही शिवाय आमोदे गावातील एक रुग्ण लवकर घरी परतनार असून दुसरा रुग्ण देखील लवकर बरे होऊन घरी परत येईल अशी आशा आहे. अशा परिस्थितीत आमोदे गावातील नागरिकांसाठी व त्यांच्या आरोग्यरक्षणासाठी शिरपूर शहरातील सीएए या व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमाने आमोदे गावातील नागरिकांसाठी सरकार मान्य होमिओपॅथिक औषधाचे वाटप दिनांक 7 मे रोजी सकाळी आठ वाजता करण्यात आले आहे. सदरच्या व्हाट्सअप ग्रुप मधून नेहमीच समाजहिताचे आणि देशा हिताचे संदेश प्रसारित करून समाज हित साधण्याचा प्रयत्न केला जातो या ग्रुप मध्ये सर्वसमावेशक अशा समाजातील सर्वच क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचा समावेश असून यांच्या माध्यमातून सदरचा उपक्रम राबविला गेला आहे. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या वेळी अँड.सुहास वैद्य,डॉ योगेश जाधव, तुषार जाधव,साईकृपा मेडिकल,अंकित शेवाळे,गोपाळ मारवाडी, अमोदा गावचे सरपंच ,सदस्य, जगदीश सिंह राजपूत ,राज देशमुख, गावकरी व सि ए ए ग्रुपचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
