मुलीने व्हिडिओ कॉलने घेतले वडिलांचे अंत्यदर्शन




शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील श्री वसंत सुकलाल वरसाळे यांचे 2 मे रोजी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या मुली औरंगाबाद आणि सारंगखेडा या ठिकाणी राहतात. त्यांना आपल्या वडिलांच्या निधनाचे वृत्त समजले. शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील नाभिक समाजाचे  वसंत सुकलाल वरसाळे यांचे वयाच्या 73 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले , दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. ते सात बहिणीचे एकुलते एक भाऊ होते. त्यांच्या या मोठ्या परिवारातील ते प्रमुख सदस्य होते.
               संपूर्ण जगात कोरोनाव्हायरसने धुमाकूळ घातल्यानंतर प्रशासनाने संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले आहे.लॉकडाऊन व संपूर्ण संचारबंदी असल्याकारणाने अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही वाहनांना परवानगी नाही अशा आणीबाणीच्या काळामध्ये आपल्या वडिलांच्या अंत्ययात्रेला व अंत्यदर्शनाला कसे पोहोचणार? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला. तसेच प्रशासनाचा नियमानुसार स्थानिक पोलिस स्टेशन, गावातील सरपंच व पोलीस पाटील यांच्या सूचनेनुसार अंत्यविधीच्या या कार्यक्रमाला केवळ 15 ते 20 लोकांना परवानगी देण्यात आली होती.
           कल्पना किशोर निकम या त्यांच्या द्वितीय सुपुत्री असून त्या औरंगाबादला राहतात . वाघाडी ते औरंगाबाद 200 किलोमीटरचे अंतर आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत ते वडिलांच्या अंत्ययात्रेला कसे पोहोचणार. त्यांनी वडिलांचे अंत्यसंस्कार अखेर नातेवाईकांनी व्हिडीओ कॉलिंग करून वडिलांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घडविले. पार्थिवास नमस्कार करून त्यांनी आपले दुःख व्यक्त केले की, वडील शांत झाल्याचे दुःख जेव्हढे नाही तेव्हढे त्यांच्याजवळ नसल्याचे व प्रत्यक्ष न पाहिल्याने अधिक दुःख होत आहे अशी शोकांतिका व्यक्त केली. आपल्या वडिलांच्या निधनाने कल्पना निकम यांचे अश्रू अनावर झाले आणि त्या रडल्या. अश्या या दुर्दैवी वेळी त्यांचे दुःख सावरण्यासाठी शेजारी असलेल्या महिलांनी नागरिकांनी त्यांचे सांत्वन केले व धीर दिला. त्यांची जेष्ठ कन्या वंदना महाले या सारंगखेडा येथील आहेत.
            त्यांची मुलं दिपक वरसाळे, संजय वरसाळे व गोपाल वरसाळे म्हणाले की , आपला देश लवकरात लवकर कोरोनामुक्त होवो. जी परिस्थिती आमची झाली आहे अशी वेळ भगवंत कृपा करून कोणावरही येऊ नये. बाप गेल्याचे आम्हा सर्वांना दुःख तर आहे परंतु अश्या या कोरोना महामारी मुळे आमच्या बहिणीला व नातेवाईकांना अंतिम दर्शन सुद्धा घेता आले नाही.देश सुरक्षित राहो हेच आम्ही आजचा दिवशी आमच्या वडिलांना श्रद्धांजली अर्पितो.दोघी बहिणींनी  लॉकडाऊनचे नियम पाळत समाजापुढे एक आदर्श निर्माण करुन दिला आहे. भारत कोरोनापासून लवकरात लवकर कोरोनामुक्त होवो असा संदेश त्यांनी दिला. त्यांचे लहान सुपुत्र गोपाल वरसाळे हे तालुक्यातील आर.सी.पटेल. प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने