केंद्र सरकारच्या निष्ठुरतेविरोधात व स्थलांतरित मजूरांच्या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची देशव्यापी निदर्शने






मुंबई,  : देशभरात लाखो मजूर, कामगारांचा रोजगार हिरावला गेल्याने त्यांना अन्नासाठी दाहीदिशा हिंडावे लागत आहे. त्यांच्याकडे खायला अन्न नाही की घरापर्यंत पोहचण्यासाठी पैसे नाहीत. आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणे त्यांच्यासाठी मोठे जिकीरीचे बनले आहे. एवढे होऊन सरकार त्यांच्या समस्यांकडे मात्र साफ दूर्लक्ष करत आहे. केंद्र सरकारच्या या निष्ठुरतेविरोधात व स्थलांतरित मजूरांच्या मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने मंगळवार दि. १९ मे २०२० रोजी देशव्यापी निदर्शने केले आहेत .अशी माहिती पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव कॉम्रेड तुकाराम भस्मे यांनी दिली आहे. 

या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे, की पंतप्रधानांची २० लाख कोटी रूपयांच्या पॅकेजची घोषणा आणि अर्थमंत्र्यांकडून त्याचे दिले जाणारे विवरण ही केवळ राजकीय बोलबच्चनगिरी आहे; त्यापेक्षा वेगळे काही नाही. त्यांच्याकडे कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाचा सामना करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नाही. मोदी सरकारच्या नवउदारमतवादी धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था आजारी पडत असून, डबघाईला पोहचली आहे. कोरानाच्या संकटाने यात आणखीणच भर घातली आहे. 

अशा परिस्थितीत लोकांना असहाय्य आणि हताश वाटू नये यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने केंद्र सरकारच्या या निष्ठुरतेविरोधात देशव्यापी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत मंगळवार दि. १९ मे २०२० रोजी पक्षाच्यावतीने स्थलांतरित मजूरांच्या मागण्यांना घेऊन देशभरात आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

यादिवशी स्थलांतरित मजूर, कामगारांसाठी अधिकाधिक रेल्वे आणि बससेवा पुरविली जावी, ज्यामध्ये त्यांना खाण्यापिण्याची सोय उपलब्ध करून द्यावी, सर्व मजूरांना प्रवास भत्ता म्हणून प्रत्येकी १० हजार रुपये द्यावेत, मनरेगा योजनेला खिळखिळी करू नये, मनरेगा अंतर्गत कामाचे दिवस वाढविले जावेत आणि प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना वेळेत कामाचा मोबदला दिला जावा,  300 रु मजुरी प्रति दिन मिळावी, मनरेगा अंमलबजावणी करणारे कंत्राटी कर्मचाऱ्यांना व ग्रामरोजगारसेवक नाकोविड विमा संरक्षण व प्रोत्साहन भत्ता द्या, शेतकऱ्यांना च्या बांधा वरील कामाचा समावेश मनरेगा त करा शहरी भागात रोजगार आणि निवाऱ्याची हमी दिली जावी, कोणत्याही अटी अथवा शर्थीविना रेशन द्यावे, कामगार कायद्यांबाबत कोणतीही छेडछाड होता कामा नये, मोलकरीण घरकामगार मंडळ साठी निधी उपलब्ध करून थेट आर्थिक मदत व सामाजिक सुरक्षा द्या, बांधकाम कामगार ना आर्थिक मदत द्या ग्रामीण भागातील गरीब लोक आणि शेतकऱ्यांच्या स्थानिक समस्यांचे ताबडतोब निराकरण करावे, वृद्ध, विधवा आणि अपंग व्यक्तींना पेन्शन आणि अन्य सामाजिक सुरक्षा निश्चित केली जावी आणि त्याच्या रक्कमेत वाढ करावी ,  कोरोना योध्या आशा, गट प्रवर्तक यांना शासकीय कर्मचारी दर्जा द्या किमान वेतन21 हजार रु लागू करा,  कंत्राटी मानधन वरील शासकीय विभाग तिल कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर कायम करा
इपीएस95 सेवानिवृत्त पेन्शनर्स कामगारांना मिळणारी पेन्शन 1ते2 हजार रुपये दरमहा मिळते देशात 70लाख पेन्शनर्स सातत्याने मागणी करत आहेत जगण्याइतके पेंशन दरमहा 9 हजार रुपये महागाई भत्ता सह त्वरित लागू करा, मालेगाव सह राज्यात असलेल्या पावरलूम कामगार ना थकीत वेतन व विशेष प्याकेज द्या, सफाई कामगार ची वैद्यकीय तपासणी करा, हातपंप दुरुस्ती देखभाल कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण व प्रोत्साहन भत्ता द्या,अशा मागण्या करण्यात आले होते.

महाराष्ट्रात ज्याठिकाणी लॉकडाऊनचे नियम लागू आहेत अशा ठिकाणी कार्यकर्त्यांनी आपल्या घराच्या आवारात सरकारच्या निष्ठूर धोरणाविरोधात काळे झेंडे दाखवून आणि काळी पट्टी बांधून विरोध दर्शवला आहे. जिथे लॉकडाऊनचे नियम लागू नाहीत अशा ठिकाणी कार्यकर्त्यांनी कामगार कार्यालय अथवा तहसीलदार / जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हातात फलक घेऊन सरकारविरोधी निदर्शने केली.मात्र यावेळी मास्कचा वापर आणि शारिरिक अंतर राखूनच हे आंदोलन होईल, याची दक्षता घ्यावी याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे, असे आवाहन कॉ. भस्मे, राज्य भारतीय कम्युनिस्ट पक्ष सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड प्रकाश रेड्डी, डॉ राम बाहेती, कॉम्रेड नामदेव चव्हाण, कॉम्रेड नामदेव गावडे, कॉम्रेड राजू देसले, कॉम्रेड शिवकुमार गणवीर यांनी केले होते.
या नुसार शिरपूर तालुक्यात देखील काळी फीत लावून कॉम्रेड सदस्यांनी
 निदर्शने केली आहेत.धुळे शहरात सध्या संचार बंदी असल्याने  सदरचे आंदोलन पादधिकारी यांनी त्यांच्या घरीच काळ्याफिती लावुन केंद्र सरकार व राज्य सरकार च्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला त्यात काॅ,हिरालाल सापे,काॅ, हिरालाल परदेशी, काॅ, पोपटराव चौधरी,काॅ,मदन परदेशी,काॅ, साहेबराव पाटील,काॅ,गुलाबराव‌ पाटील,काॅ,रमेश पारोळेकर,काॅ,वसंत पाटील,काॅ,हुसेन बेग कादर बेग,काॅ,अर्जुन कोळी,काॅ,संतोष पाटील,‌आदीं सहभागी होऊन    निषेध दिवस पुकारण्यात आला,‌  

  

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने