शिरपूर प्रतिनिधी शिरपूर तालुक्यात कारवाईसाठी गेलेल्या वनविभागाच्या पथकावर हल्ला केल्याची घटना तालुक्यातील करवंद येथे घडलीआहे .याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सविस्तर वृत्त असे की सूळे वनक्षेत्र परिसर शिरपूर प्रादेशिक परिमंडळ अधिकारी नितीन अशोक बोरकर यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की करवंद तालुका शिरपूर या गावात ग्रामपंचायत कार्यालय जवळ अधिकारी आणि त्यांचे पथक हे मिळालेल्या माहितीच्या आधारे गोटू देवीदास पाटील ,सागर देविदास पाटीलव यांच्या विरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी दिनांक 2 मे रोजी सकाळी नऊ वाजता गेले असता संबंधितांकडून ट्रॉली ताब्यात घेणार येणार होती परंतु आरोपी गोटू देवीदास पाटील राहणार करवंद तालुका शिरपूर व अन्य यांनी सदर पथक करत असलेल्या कारवाई व शासकीय कामात अडथळा आणला अधिकारी नितीन बोरकर व त्यांचे सहकारी यांच्यावर कात्रीने वार करण्याचा प्रयत्न केला बोरकर यांच्या हातातील घड्याळ तोडून खाली पडून नुकसान झाले तसेच या दोघांनी पथकाला शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली त्यानुसार वरील दोन्ही आरोपींच्या विरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भा द वि कलम 53/ 504 /506 /427/ 34 अन्वय व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37/ 1 /135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र शासकीय कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी असा अचानक हल्ला करणे योग्य नसून यामागे देखील काही कटकारस्थान आहे का याबाबत सखोल चौकशी होऊन कठोर कार्यवाही होण्याची गरज व्यक्त होत आहे.
