कोरोनाच्या लढ्यात एस पी डी एम महाविद्यालय खेळाडूंचे विशेष योगदान



शिरपूर - कोरोनाच्या लढ्यात एस पी डी एम महाविद्यालय खेळाडूंचे विशेष योगदान
कोरोना सारख्या महामारी मध्ये स्थानिक प्रशासन ते केंद्रीय प्रशासनापर्यंत सर्वजण अतोनात जनजागृतीचे काम करत आहेत. सरकारपुढे असंख्य प्रश्न असताना सामाजिक बांधिलकी जपून काही सामाजिक संस्था या जनजागृती मध्ये आपले योगदान देत आहेत. त्यातच एस पी डी एम  महाविद्यालयाचे विविध स्तरावर खेळलेले खेळाडू विद्यार्थी अपूर्ण मनुष्यबळ असलेल्या ठिकाणी आपले योगदान देत आहेत. महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी विशेष पोलीस अधिकारी म्हणून आपले कर्तव्य बजावत आहेत. खेळाडू हा मानसिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या सक्षम असल्याने पोलीस प्रशासनाकडून त्यांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून तात्पुरत्या स्वरूपात पोलिस सेवेत दाखल करून घेतले आहेत.महाविद्यालयाचे ध्येय आणि संस्कार विद्यार्थ्यांच्या अंगी असल्याने त्यांच्यात राष्ट्रभक्ती संचारली असून ते आज कोरोना सारख्या महामारीत शिरपूर शहरात विशेष योगदान देत आहेत.कु हेमंत शिरसाठ,कु दीपक गिरासे,कु गोसावी सुदर्षण,कु हितेश गुरव,कु गिरासे ललित आदी खेळाडू मुले योग्य जबाबदारी पार पाडत आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एन पटेल यांनी खेळाडू विद्यार्थ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे नमूद करून महाविद्यालय सशक्त युवक घडवण्याचे काम करत आहे.तसेच येणारा काळ हा नक्कीच आशादायी असेल असे मत व्यक्त करून महाविद्यालयीन युवकांना समाजसेवेसाठी एक होण्याचे आवाहन केले.या कामी क्रीडाविभाग प्रमुख डॉ एल के प्रताळे,महाविद्यालयीन अंतर्गत गुणवत्ता सुधारणा समितीचे तसेच नॅक चे समनव्यक डॉ दिनेश भक्कड,उप प्राचार्य डॉ महेंद्र पाटील,प्रा दिनेश पाटील हे मदत करत आहेत.
महाविद्यालयाच्या या यशस्वी उपक्रमाचे विशेष कौतुक किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ तुषार रंधे, सचिव श्री निशांत रंधे,खजिनदार श्रीमती आशाताई रंधे,तसेच संस्थेचे विश्वस्त श्री रोहित रंधे यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने