थाळनेर पोलिसांनी केली अनेर नदीच्या काठावरील दारुभट्टी उध्वस्त,गुन्हा दाखल




थाळनेर -
अनेर नदीच्या काठावर सुरु असलेल्या दारूभट्टीवर थाळनेर पोलिसांनी कारवाई करत एकाला ताब्यात घेतले.
शिरपूर तालुक्यातील भावेर येथील अनेर नदीपात्राच्या किनारी झाडाझडपात रसायन बाळगुन कच्चे रसायनची गावठी दारू हातभट्टी सुरु असल्याची गोपनीय माहिती थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना मिळाली त्यामाहिती नुसार सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे,पो कॉ.सिराज खाटीक,पो कॉ रवींद्र पावरा,चालक पो.ना.सुनिल पगारे,होमगार्ड अनिल पावरा आदींनी घटनास्थळी जाऊन २० हजार ५०० किंमतीचे ५ ड्रममध्ये २०० लिटर प्रमाणे १००० लिटर रसायन ,गावठी दारू व साहित्य असा एकुण २०,८५० किंमतीचा मुद्देमालसह चोपडा तालुक्यातील घोडगांव येथील संशयित शरद रमेश कोळी यास ताब्यात घेतले आहे.
थाळनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने