एसपीडीएम महाविद्यालयातर्फे लॉक डॉऊन काळात वर्क फ्रॉम होम अंतर्गत राष्ट्रीय वेबिनार सिरीजचे आयोजन ..




शिरपूर - 
येथील किविप्र संस्थेच्या एसपीडीएम महाविद्यालयाच्या आयक्युएसीतर्फे १२ मे ते १६ मे या काळात वर्क फ्रॉम होम या अंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोग व कबचौ उमवि जळगाव यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राष्ट्रस्तरीय ऑनलाईन वेबिनार सिरीज चे आयोजन संस्थाध्यक्ष मा . भाऊसो डॉ . तुषार रंधे सचिव नानासो निशांत रंधे कोषाध्यक्षा मा . ताई सो आशाताई रंधे विश्वस्त मा . रोहित रंधे प्राचार्य डॉ .एस एन पटेल,महाविद्यालयीन गुणवत्ता सुधार समितीचे तसेच नॅक समितीचे समनव्यक डॉ डी डी भक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे ..१२ मे रोजी एक्सरसाईज् अँड डायेट डुरिंग क्वारंटाईन अँड लॉकडाऊन  या विषयावर श्रीमती श्रेया आढाव मार्गदर्शन करतील .. डॉ .संदीप जगताप औरंगाबाद व प्रा .एल.के प्रताळे संयोजन करतील .१३ मे रोजी इम्पॉरटन्स ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटस इन मॉर्डन एरा या विषयावर डॉ विजेता सिंग जळगाव मार्गदर्शन करतील .. डॉ .मंजुषा अहिरराव व डॉ .एम व्ही पाटील संयोजन करतील .१४ मे रोजी व्हॅल्यू एज्युकेशन : नेचर अँड नीड या विषयावर प्रा . वसंत गिरी मेहेकर बुलढाणा हे मार्गदर्शन करतील .डॉ .आर.एन. लुंगसे व प्रा डॉ . फुला बागूल संयोजन करतील .१५ मे रोजी पोस्ट कोविड जिओपॉलिटिक्स ग्लोबल ऑर्डर या विषयावर डॉ . विजय खरे पुणे विद्यापीठ हे मार्गदर्शन करतील .डॉ .के.डी. धर्माधिकारी व डॉ .एस बी कांबळे संयोजन करतील .१६ मे रोजी टॉपिकल फार्मा अँड पर्सनल केअर प्रॉडक्टस इन कोवीड क्रायसीस या विषयावर डॉ कपील चौधरी मुंबई हे मार्गदर्शन करतील . प्रा .सौ. एस .पी. महिरे डॉ . शरद पाटील संयोजन करतील .
सर्व व्याख्याने सायं .४ते ५ या वेळेत झूम अॅप वर व यू ट्युबवर ऑनलाईन ऐकता येतील .. या वेबिनार मालिकेसाठी देशभरातून आठ हजार अभ्यासक संशोधक प्राध्यापक यांनी नोंदणी केली आहे ..
कुलगुरू मा . प्रो .पी पी पाटील . प्र . कुलगुरू प्रो . माहुलीकर यांनी सदिच्छा दिल्या आहेत .. सहभागी प्राध्यापकांना ई सर्टिफिकेट तात्काळ मेल वर पाठविण्यात येणार आहे . कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही असे प्राचार्य डॉ .एस एन पटेल यांनी सांगितले . उपप्राचार्य प्रा . दिनेश पाटील डॉ एम व्ही पाटील यांचे सह आयक्यूएसी समन्वयक डॉ .डी डी भक्कड  प्रा .एल.के प्रताळे प्रा . लखन चौधरी प्रा परेश पाटील प्रा सोलंकी  प्रा . किशोर राजपूत श्री . संजय निकम श्री समीर सूर्यवंशी यांचे तांत्रिक सहकार्य मिळत आहे .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने