शिरपुरात 5 दिवसाचा जनता कर्फ्यू- प्रांताधिकारी सो शिरपूर




शिरपूर - शिरपूर वरवाडे नगरपरिषद क्षेत्रातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, शिरपूर शहरात कोरोनाचे ७ रूग्ण आढळले आहेत. आजमितीस शिरपूर मध्ये  शहरातील प्रमुख सर्व पक्षीय नागरीकांच्या विनंतीनुसार जनता कर्फ्यू' पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 
संपूर्ण शिरपूर शहरात दि. २९ मे २०२० ते दि. २ जून २०२० या पाच दिवसांच्या काळात शहरातील हाॅस्पिटल व त्यांच्याशी संलग्न औषधांची दुकाने वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहतील. लाॅकडाऊनच्या काळात कोणीही नागरिकाने कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायदा आणि कलम 188 नुसार कडक कारवाई करण्यात येईल. असे आदेश मा . प्रांताधिकारी डाॅ. विक्रम बांदल यांनी दिले आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने