पंतप्रधान निधीसाठी तहसिलदारांकडे 11111 रुपयेचा धनादेश भास्कर बोरसे यांचाकडुन सुपुर्द देशाला संकटकाळी मदतीसाठी दानशुर दात्यांनी पुढे यावे : आ. काशिराम पावरा





शिरपूर : कोरोना महामारीने अवधा देश गेल्या दोन महिन्यापासुन टाळेबंद असल्याने देशाची आर्थिक स्थिती खालावली आहे. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी केंद्र व राज्य सरकाराने दानशुर व्यक्तींना पुढे येण्याचे आवाहान केले. अनेक दानशुर व्यक्ती पुढे येऊन केंद्र व राज्य सरकारला आर्थिक मदत करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहानाला प्रतिसाद देत आ. काशिराम पावरा, भाजपा धुळे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा प्रमुख उपस्थितीत नायब तहसिलदार गणेश आढारी यांचाकडे शिरपूर तालुक्यातील सांगवी येथील धोबी समाज जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच संघटना तालुकाध्यक्ष भास्कर बोरसे यांनी (दि.19.मे) रोजी 11111 रुपयेचा धनादेश सुपुर्द केला. याप्रसंगी अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष एकनाथराव बोरसे, परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, माजी नगर सेवक अशोक कलाल, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, भाजपा चिटणीस संजय आसापुरे, परिट (धोबी) सेवा मंडळ तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे, शिरपूर कृउबा समिती संचालक अॅड. प्रताप पाटील आदी उपस्थित होते.
   कोरोना संकटकाळात आपणही देशाला काही देणे लागतो या भावनेतुन सामाजिक बांधिलकीचा वसा जपत भास्कर बोरसे यांनी 11111 रुपयेचा धनादेश पंतप्रधान सहाय्याता निधीसाठी शिरपूरचे नायब तहसिलदार गणेश आढारी यांचाकडे नुकताच सुपुर्द केला.
   यावेळी आ. काशिराम पावरा म्हणाले कि, देशाला कोरोना महामारीने हाहाकार करुन सोडला असुन राज्यासह देश दोन महिन्यापासुन लाॅकडाऊनमध्ये अडकला आहे तसेच शिरपूर तालुक्यासह जिल्हातुन अनेक जण राज्य व केंद्र सरकारला मदत करत आहेत या संकटकाळी अजुन मदत करण्यासाठी दानशुर व्यक्तींनी स्वता:हुन दात्यांनी पुढे यावे असे ही आवाहान त्यांनी केले.
   तालुक्यातील सांगवी येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर बोरसे यांनी केंद्र सरकारला मदत देण्याचे ठरवले त्यानुसार त्यांनी आ. काशिराम पावरा, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नायब तहसिलदार गणेश आढारी यांचाकडे 11111 रुपयेचा धनादेश सुपुर्द केला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने