1एच. आर. पटेल फार्मसीचे कोविड १९ वर जनजागृतीपर ऑनलाईन क्विझ





शिरपूर - एच. आर. पटेल फार्मसीच्या कोविड १९ ऑनलाईन क्विझद्वारे सर्वेक्षण करण्यात आले. करोना बाबत ८५ टक्के लोक जागरूक असल्याचेस्पष्ट झाले असून सहा राज्यातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.करोनाचा (कोविड १९) संसर्ग आणि त्याबाबत ८५ टक्के लोक जागरूक असल्याचे महाविद्यालयाने नुकत्याच घेतलेल्या राष्ट्रीय स्तरावर क्विझद्वारे घेतलेल्या सर्वेक्षणाच्या नित्कार्षातून स्पष्ट झाले आहे. या ऑनलाईन सर्वेक्षणाला विविध राज्यातील विविध वयोगटातील ३४७५ विद्यार्थ्यांचा व नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी दिली.
जगभरात लाखो लोकांना करोनाचा संसर्ग झालेला आहे व त्याच्या प्रादुर्भावाचा फटकाही बसलेला आहे, हा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचा मार्ग अवलंबला आहे त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने करोना या संसर्गजन्य आजाराच्या विविध पैलुंशी संबंधित जनजागृती होण्याच्या उद्देशाने सर्वेक्षण करण्याच्या सूचना सर्व सदस्य देशांना दिल्या होत्या त्याअन्वे करोनाबाबत नागरिकांमध्ये जागृतता निर्माण होण्यासाठी महाविद्यालयाने क्विझद्वारे ऑनलाईन सर्वेक्षणाचा मार्ग निवडला. या सर्वेक्षणामध्ये देशातील आपल्या महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान व तामिननाडू येथील १८ ते ६३ वयोगटातील नागरिकांनी उत्फूर्त प्रतिसाद प्रकट केला. 
सदर सर्वेक्षणातील नित्कार्षानुसार ८५ % लोक हे करोनाची साथ व त्याबद्दल घ्यावयाची काळजी या बद्दल जागरूक आहेत व आपल्या सभोवती इतरात जागृतता वाढवण्याच्या उदिष्टाने सहभागी नागरिकांना एक शपथही देण्यात आली त्या नुसार जागरूक नागरिक समाजातील इतर घटकांत व सर्वसामान्यांना समुपदेशन करतील. संबंधित सर्वेक्षणाचे नित्कर्ष हे नागरिकांकडून प्राप्त झालेल्या प्रतिसादानुसार केवळ अभ्यासासाठी व संशोधनाच्या दृष्टीने प्रकाशित केले आहेत, यात २२ ते ४६ वयोगटातील नागरिक अधिक सतर्क व जागृत आढळून आलेत. या कोविड १९ वरील ऑनलाईन क्विझच्या आयोजनासाठी महाविद्यालयाच्या औषधी रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रविण पाटील व प्रा. प्रशांत पाटील यांनी परिश्रम घेतले.
तसेच करोनामुळे देशावरील आर्थिक संकट लक्षात घेवून कोविड - १९ निधीसाठी महाविद्यालाच्या सर्व प्राध्यापक व प्रध्यापकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी एका दिवसाचे वेतन शासन निधीसाठी जमा केले आहे.
या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगरसेवक तपनभाई पटेल, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, सर्व संचालक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी समाधान व्यक्त केले. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

1 टिप्पण्या

थोडे नवीन जरा जुने