माहिती व जनसंपर्कच्या महासंचालकपदी डॉ. दिलीप पांढरपट्टे रुजू


मुंबईदि. 21 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव आणि महासंचालक म्हणून डॉ.दिलीप पांढरपट्टे (भा.प्र.से.) यांनी आज पदभार स्वीकारला.
श्री. पांढरपट्टे यांची 1987 मध्ये उपजिल्हाधिकारी या पदावर निवड झाली. 2000 मध्ये अपर जिल्हाधिकारी म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. 27 मार्च 2015 साली त्यांची भारतीय प्रशासन सेवेत नियुक्ती करण्यात येऊन त्यांचा समावेश 2004 च्या बॅचमध्ये करण्यात आला.
            श्री. पांढरपट्टे यांनी 1981 मध्ये बी.एस्सी.1983 मध्ये बी.एड्.2005 मध्ये एल.एल.बी.2008 मध्ये एल.एल.एम.2014 मध्ये एम.बी.ए. आणि 2017 मध्ये  पीएच्.डी याप्रमाणे पदव्या प्राप्त केल्या आहेत. 
श्री. पांढरपट्टे यांचे वेगवेगळ्या पदावर काम
डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनी 1989-उपविभागीय अधिकारीसावंतवाडी (सिंधुदुर्ग)1989-91 - उपविभागीय अधिकारीदापोली (रत्नागिरी)1991-92 -जिल्हा पुनर्वसन अधिकारी,रायगड1992-96- उपविभागीय अधिकारीमाणगांवरायगड1996-97 - सहाय्यक आयुक्त मागासवर्ग कक्ष (कोकण विभाग)1997-2000- निवासी उपजिल्हाधिकारीरायगड2000-2001 - प्रादेशिक विशेष अधिकारीविभागीय चौकशी (कोकण विभाग)2001-2004 - उपायुक्तठाणे महानगरपालिका2004-2005- उपसचिव (सांस्कृतिक कार्य विभाग)2005-2006-उपायुक्त (सामान्य प्रशासन)कोकण विभाग2008-2011 - अपर जिल्हाधिकारीसिंधुदुर्ग2011-2013 - अध्यक्ष,जात प्रमाणपत्र पडताळणी समिती (कोकण विभाग/रत्नागिरी)2013-2015-मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषदसिंधुदुर्ग2015-ऑगस्ट 2016 मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषदरायगड11 ऑगस्ट 2016 ते 20 एप्रिल2018 जिल्हाधिकारीधुळे07 मे2018 पासून जिल्हाधिकारीसिंधुदुर्ग म्हणून 20 जानेवारी 2020 पर्यंत ते कार्यरत होते.
वाड;मयीन कामगिरी :
प्रशासकीय सेवा बजावताना श्री. पांढरपट्टे यांनी आपल्या वाङ्मयीन व साहित्यिक सर्जनशीलतेला कायम फुलवीत ठेवले. त्यांची साहित्यसंपदा  पुढीलप्रमाणे आहे.
•          'घर वा-याचेपाय पा-याचे' (ललित लेखसंग्रह तीन पुरस्कार)
•          'कथा नसलेल्या कथा' (कथासंग्रह)
•          'बच्चा लोग ताली बजाव' (विनोदी लेखसंग्रह)
•          'शायरी नुसतीच नाही' (उर्दू शायर आणि शायरीचा परिचय)
•          'शब्द झाले सप्तरंगी' (मराठी गजल संग्रह) चार आवृत्या
•          सव्वाशे बोधकथा भाग-1 (बोधकथा संग्रह) दोन आवृत्या
•          सव्वाशे बोधकथा भाग-2 (बोधकथा संग्रह)
•          डॉ.राम पंडित संपादित 'मराठी गजल
•          'राहील त्याचे घर' (कुळकायद्यातील घरठाण हक्काबाबत)
साहित्यिक उपक्रम :
•          गजल तसेच अन्य विषयांवरील व्याख्यानांचे महाराष्ट्रभर व राज्याबाहेर अनेक कार्यक्रम.
•          गजल/गीतांच्या सी.डी. प्रकाशित (मराठी व उर्दू).
•          दैनिक सकाळ (मुंबई) मध्ये बोधकथा या सदरातून पाचशे बोधकथा प्रसिद्ध.
•          आकाशवाणी /दूरदर्शन मधून कविता व गद्य लेखन.
•          उर्दू भाषा व लिपी शिकून उर्दू मध्ये 'रिंदया  नावाने गजल लेखन.
•          'शब्द झाले सप्तरंगीव 'गजल- रेगिस्तान से हिंदुस्तान तकतसेच 'गालिब और मैंया कार्यक्रमांतून गजल सादरीकरण.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने